Wednesday, September 24, 2014

नवरात्र उत्सव व्रत पुजा

नवरात्रोत्सव
हा सण नऊ दिवस आदिशक्तीची आराधना करण्याचा आहे.
पावसाळा बहुतेक संपलेला असतो, शेतांतील पिके तयार होत आलेली असतात, काही तयार झालेली असतात आणि शेतकरी खुशीत असतो.
नवरात्राच्या पहिल्या दिवशी घटस्थापना होते. त्या दिवसापासून महाराष्ट्रात संध्याकाळी अंगणात भोंडला खेळला जातो. एका पाटावर हत्ती काढून त्याची पूजा करतात. पाटाभोवती फेर धरून स्त्रिया, आणि विशेषतः मुली, भोंडल्याची पारंपरिक गाणी म्हणतात.
घटामध्ये नंदादीप प्रज्वलित करून ब्रह्मांडातील आदिशक्ति-आदिमायेची मनोभावे पूजा करणे, म्हणजेच घटस्थापना किंवा नवरात्रोत्सव. घटरूपी ब्रह्मांडात मारक चैतन्यासहित अवतीर्ण झालेल्या तेजस्वी अशा आदिशक्तीचे अखंड तेवणाऱ्या नंदादीपाच्या माध्यमातून नऊ दिवस पूजन करणे, म्हणजे नवरात्रोत्सव साजरा करणे.

देवीची नऊ रुपे

प्रथमं शैलपुत्रीति, द्वितियं ब्रह्मचारिणी ।
तृतीयं चन्द्रघण्टेति, कूष्मांडीति चतुर्थकम् ।।
पंचमं स्कंदमातेति षष्ठं कात्यायनीतिच ।
सप्तमं कालरात्रिश्च महागौरीतिचाष्टमम् ।।
नवमं सिद्धिदां प्रोक्ता नवदुर्गाः प्रकीर्तिताः ।
उक्तान्येतानि नामानि, ब्रह्मणैव महात्मना ।।
१. शैलपुत्री, २. ब्रह्मचारिणी ३. चन्द्रघंटा ४. कूष्मांडी ५. स्कंदमाता ६. कात्यायनी ७. कालरात्री ८. महागौरी ९. सिद्धिदात्री अशी ही देवीची नऊ रूपे आहेत.

माहात्म्य

नवरात्रीतील नऊ दिवसांच्या काळात दुर्गादेवी तेजतत्त्वाच्या आधारे आपल्या नऊ प्रमुख शस्त्रांसहित ब्रह्मांडात विहार करते, असा समज आहे. आदिशक्तीचे हे दरदिवशी नव्या रूपांसहित भ्रमण करणे, म्हणजेच दरदिवशी चढत्या क्रमाने सप्तपाताळांतून पृथ्वीवर येणाऱ्या त्रासदायक लहरींचे समूळ उच्चाटन करणे.
हे नऊ दिवस ब्रह्मांडात वाईट शक्तींनी प्रक्षेपित केलेल्या त्रासदायक लहरी, तसेच आदिशक्तीच्या मारक व चैतन्यमय लहरींचे युद्ध चालू असते. या वेळी ब्रह्मांडातील वातावरण तप्त झालेले असते व दुर्गादेवीच्या शस्त्रांतून तेजाची झळाळी अतिवेगाने सूक्ष्म शक्तींवर हल्ला करत असते, अशी कल्पना आहे.
याचे प्रतीक म्हणून घट व त्यातील नंदादीप यांना प्रतीकात्मक रूपात पूजले जाते. घटात दीपाच्या उष्णतेमुळे निर्माण झालेले वातावरण हे ब्रह्मांडात नऊ दिवस अहोरात्र सुरू असलेल्या युद्धातून निर्माण झालेल्या तप्त वायुमंडलाशी साधर्म्य दर्शवते, तर दीप हा आदिशक्तीच्या शस्त्रास्त्रांतून निर्माण होणाऱ्या तेजाचे प्रतीक म्हणून कार्य करतो. घरात घटपूजन केल्याने वास्तूमध्येही दुर्गादेवीचे मारक चैतन्य कार्यरत होऊन वास्तूमधील त्रासदायक लहरींचे निर्दालन करते, अशी या मागची धार्मिक श्रद्धा आहे.

पूजाविधी

पूजा सामग्री :-
हळ्द, कुंकू , सिंदूर, काजळ, गंध, आंब्याची पाच पाने, आंब्याच्या पाच पानांचा टहाळा, कापूर, धूप, उदबत्ती, कुंकुममिश्रित अक्षता, विड्याची पाने, सुपाऱ्या, खोबऱ्याची वाटी, गूळ, ५ नारळ, ५ खारका, ५ बदाम, साखर, फुले, तांबडी फुले, झेंडूची फुले, गुलाब, तांबडे कमळ, दूर्वा, दूर्वाग्म ( दूर्वाची जुडी), शमी, बेल, तुळशी, पाच फळे, केळी, दूध, दही, तूप, साखर, मध हे पाच पदार्थ पंचामृतासाठी. दोन कापसाची वस्त्रे, चंदन ( सहाण व खोड ).
देवीसाठी चोळी, मंगळसूत्र, हिरव्या बांगडया, पळी पंचपात्र, तीर्थासाठी भांडे, ३ पाट, २ पाण्याने भरलेले कलश (घटस्थापनेसाठी ), शंख , घंटा , निरांजन , समई , वाती , कापूरारती, धूपारती, उदबत्तीचे घर, नंदादीप, सुंगंधी द्रव्ये, सुटी नाणी, गोडतेल, तूप-वाती निरांजनासाठी, फुलांचा हार, घटस्थापना करण्यासाठी दोन पाण्याने भरलेले कलश, त्यावर ठेवण्याकरिता दोन ताम्हने, कलशात टाकण्यासाठी वारूळ, गोठण इत्यादी पवित्र ठिकाणची माती, कलशात टाकण्यासाठी हळद, आंबेहळद, नागरमोथा इत्यादी औषधी द्र्व्ये, कलशावर ठेवण्याकरिता पाच आंब्याची पाने, त्यावर नारळ, देवीला नैवेद्यासाठी नारळाचे चूर्ण, साखर, दूध आणि महानैवेद्य.
हवनासाठी :-
यज्ञकुंडासाठी चार विटा, नवीन चार पाट, तांदूळ १ किलो, २ कलश पाण्याने भरलेले, त्यावर ठेवण्याकरिता दोन ताम्हने, पाच प्रकारची फळे, खारीक, बदाम, खोबरे, गूळ, २० सुपाऱ्या, विडयाची पाने, फुले, आंब्याची पाने, गणपतीची मूर्ती, देवीची मूर्ती, गुरुजींना देण्याकरिता चांदीची गाईची मूर्ती व वस्त्रे. शिवाय लाकूड, तूप, लोणी, चंदनाची व आंब्याची वृक्षाची काष्ठे, भात, सातू, तीळ, समिधा, उसाचे तुकडे, सुगंधी पुष्पे, दूर्वा, गोमूत्र, पंचगव्य, पांढरी मोहरी, रुप्याचे नाणे, कोहळा इत्यादी.
दारावर लावण्यासाठी झेंडूचे तोरण. होमासाठी नैवेद्य. रुजवणासाठी लाल माती भरलेली एक परडी, नऊ प्रकारची धान्ये. याप्रमाणे घटस्थापनेची पूजा व हवन विधी यासाठी साहित्य जमा करावे आणि प्रसन्न मनाने पूजेला बसतात. देवी आपले मनोरथ पूर्ण करील अशी पूजा करणाऱ्याची श्रद्धा असते.
देवी पूजा विधी :-
महाकाली-महालक्ष्मी - महासरस्वती या त्रिशक्तींबरोबर दुर्गा देवीची पूजा करण्याची प्रथा अनेक कुटुंबात आहे. अनेक कुटुंबाची दुर्गा ही कुलदेवता आहे. या पूजाविधीत कुलाचारांना प्राधान्य असते.
नवरात्र हे एक महान व्रत आहे. आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत हे व्रत प्रतिवर्षी करतात. हे व्रत म्हणजे एक राष्ट्रीय उत्सवही आहे.
आश्विन शुद्ध प्रतिपदेस घरात अत्यंत शुचिर्भूत अशा जागी घटस्थापना करतात. एका तांब्याच्या कलशावर ताम्हन ठेवून त्यात मंडलाकार मुख्य देवता महाकाली-महालक्ष्मी - महासरस्वती यांची व त्याच्या अनेक परिवार देवतांची स्थापना करतात. दुसरा एक तांब्याचा कलश शुध्द पाण्याने भरून त्यात सुगंधी द्रव्ये, सव्वा रुपया व सुपारी ठेवतात. कलशाच्या मुखावर पाच आंब्याची पाने ठेवून त्यावर मध्यभागी नारळ ठे्वतात. या कलशाच्या पायथ्याशी एका परडीत लाल माती टाकून त्यामध्ये नऊ प्रकारची धान्ये पेरतात.. या पेरलेल्या धान्यावर रोज पाणी शिंपडतात. ते छोटेसे शेत फुलून आले की घरामध्ये धनधान्याची समृद्धी होते अशी कल्पना आहे. याच हेतूने हे धान्य रुजत घालतात. या रुजवणाच्या एका बाजूला घंटा, दुसऱ्या बाजूला शंख इ मधोमध निरांजन प्रज्वलित करुन ठेवतात. देवीसमोर नंदादीप नऊ दिवस अखंड पेटत ठेवतात. दीपाच्या ज्योतीतून निघालेला प्रकाश हे देवीच्या तेजाचे प्रतीक आहे, देवीच्या शक्तीचे स्वरूप आहे, अशी मान्यता आहे. कलशाला पुष्पहार घालून कलशावर झेंडूच्या फुलांची माळ सोडतात. घराच्या मुख्य दरवाजावर झेंडूच्या फुलांचे तोरण बांधण्याची प्रथाही आहे. नवीन रेशमी वस्त्र नेसून पूजेच्या वेळी पाटावर बसतात. तेलवात घातलेली समई प्रज्वलित करून स्वतःला कुंकू लावून पूजेला आरंभ करतात.
आचमन -
हातात पाणी घेऊन फक्त दोनदा आचमन करतात. नंतर भगवान श्रीविष्णूच्या चोवीस नावांपैकी पहिली तीन नावे उच्चारून एकेक आचमन करतात.
त्यानंतर हात धुऊन चौथ्या नावापासून पुढील नावे हात जोडून म्हणतात.
ॐ केशवाय नम: । ॐ नारायणाय नम: । ॐ माधवाय नम: । ॐ गोविंदाय नम: । ॐ विष्णवे नम: । ॐ मधुसूदनाय नम: । ॐ त्रिविस्र्माय नम: । ॐ वामनाय नम: । ॐ श्रीधराय नम: । ॐ हृषीकेशाय नम: ।
ॐ पद्मनाभाय नम: । ॐ दामोदराय नम: । ॐ संकर्षणाय नम:। ॐ वासुदेवाय नम: । ॐ प्रद्युम्नाय नम: ।
ॐ अनिरुध्दाय नम: । ॐ पुरुषोत्तमाय नम: । ॐ अधोक्षजाय नम: । ॐ नारसिंहाय नम: । ॐ अच्युताय नम: ।
ॐ जनार्दनाय नम: । ॐ उपेन्द्राय नम: । ॐ हरये नम: । ॐ श्रीकृष्णाय नम: ।
प्राणायाम -
प्राणायाम करताना म्हणावे -
ॐ प्रणवस्य परब्रम्ह ऋषि। परमात्मा देवता । दैवी गायत्री छंद: । गायत्र्या गाथिनो विश्वामित्र ऋषि : । सविता देवता । गायत्री छंद: । प्राणायामे विनियोग: । ॐ भू: ॐ भुव: ॐ स्व: ॐ मह: ॐ जन: ॐ तप: ॐ सत्यम्‌ ॥
ॐ भूर्भुव: स्व: । ॐ तत्सवितुर्वरेण्यम्‌ । भर्गो देवस्य धीमहि । धियो यो न: प्रचोदयात्‌ । ॐ आपोज्योती रसोऽमृतं ब्रह्मभूर्भुव: स्वरोम ‍ देवादिकांना वंदन - श्रीमन्महागणाधिपतये नम: । श्री सरस्वत्यै नम: । श्री गुरुभ्यो नम:। वेदाय नम: । वेदपुरुषाय नम: ।
इष्टदेवताभ्यो नम: । कुलदेवताभ्यो नम: । स्थानदेवताभ्यो नम: । ग्रामदेवताभ्यो नम:।वास्तुदेवताभ्यो नम: । शचीपुरंदराभ्यां नम: । उमामहेश्वराभ्यां नम: । श्री लक्ष्मी नारायणाभ्यां नम: ॥ कालकामपरशुरामेभ्यो नम: । मातृपितृभ्यां नम: । आदित्यादि नवग्रहदेवताभ्यो नम: । सर्वेभ्यो देवेभ्यो नम:। सर्वेभ्यो ब्राम्हणेभ्यो नम: । उपस्थितसर्वलोकेभ्यो नम: । एतत्कर्मप्रधानदेवताभ्योअ नम: ॥ अविघ्नमस्तु ॥
प्रार्थना -
आरंभलेली पूजा निर्विघ्न पार पडावी यासाठी गणपती,सरस्वती , ब्रम्हा-विष्णू-महेश, गुरुदेव इत्यादींना हात जोडून प्रार्थना करतात.
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ । निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ।१॥ या कुंदेन्दुतुषारहार धवला या शुभवस्त्रावृता । या वीणावरदण्डमंडितकरा या श्वेतपद्मासना
या ब्रह्मच्युतशंकर प्रभृतिभिदैवै: सदा वंदिता । सा मां पातु सरस्वती भगवती नि:शेष जाड्यापहा ॥२॥
गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: । गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्रीगुरुवे नम: ॥३॥
सर्वत सर्वकार्येषु नास्ति तेषाम मंगलम्‍ । येषां हृदिस्थो भगवान मंगलायतनं हरि: ॥४॥
तदेव लग्न सुदिनं तदेव । ताराबलं तदेव विद्याबलं दैवबं तदेव । लक्ष्मीपते तेङघ्रियुगं स्मरामि ॥५॥
सर्वेष्वारब्धकाकार्येषु त्रयस्त्रिभुवनेश्वरा: । देवा दिशन्तु न: सिद्धि: ब्रह्मोशानजनार्दना: ॥६॥
देशकालादींचे उच्चारण -
ॐ श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मण: द्वितीये परार्धे विष्णुपदे, श्रीश्वेतवाराहकल्पे वैवस्वतमन्वन्तरे , भरतवर्षे भरतखंडे, जंबुद्वीपे इषुपाद्रामक्षेत्रे गोदावर्या: ( दक्षिणे। उत्तरे ) तीरे, कलियुगे । कलिप्रथमचरणे। अष्टविंशत्याम्‌ युगे । बौद्बावतारे । शालिवाहन शके । ... नाम + संवत्सरे । दक्षिणायने । शरदऋतौ । आश्विनमासे शुक्लपक्षे... तिथौ ... + वासरे + अद्य .... दिवस नक्षत्रे + विष्णुयोगे
विक्ष्णुकरणे ..... + स्थिते वर्तमाने चन्द्रे ।
.... स्थिते श्रीसूर्ये । .... स्थिते देवगुरौ ग्रहेषु यथ:यथंराशिस्थितेषु सत्सु
एवंगुणविशेषविशिष्टायां शुभपुण्यतिथौ ।
+ जे दिनमान असेल त्याचे उच्चारण करतात.
संकल्प -
मम आत्मन: श्रुतिस्मृतिपुराणोक्त फलप्राप्त्यर्थ, अस्माकं सर्वेषां सहकुटुंबानां
क्षेम- स्थैर्य-विजय - अभय - आयुरारोग्य- ऐश्वर्याभिववृद्ध्यर्थ
द्विपद-चतुष्पादानां शांत्यर्थ पुष्ट्यर्थ तुष्ट्यर्थ । समस्त मंगलावाप्त्यर्थ।
समस्त दुरितोपशांत्यर्थ । समस्ताभ्युदयार्थ च इष्टकामसंसिद्ध्यर्थ ।
कल्पोतफलावात्प्यर्थ । ... मम सहकुटुंबस्य त्रिगुणात्मका श्रीदुर्गाप्रीतिद्वारा
सर्वापच्छांतिपूर्वक दीर्घायुधर्नन - पुत्रदिवृध्दि - शत्रुपराजय -
किर्तिलाभ- प्रमुख - चतुर्विध- पुरुषार्थ - सिध्दयर्थ - अद्यारंभ्य नवमीपर्यंत
महाकाली - महालक्ष्मी - महासरस्वती नवदुर्गा प्रीत्यर्थ
मालाबंधनं अखंड दीपप्रज्वालनपूर्वकं
कुलाचार असेल त्याप्रमाणे उच्चारतात. -
चंडिकास्तोत्र -
तन्मंत्र जप- ब्राम्हणकुमारी पुजन-उअपवास-नक्तैभुक्तान्यतम-नियमादिरूपं
शारदानवरात्रपूजां करिष्ये ।
तदंगत्वेन प्रतिपदा विहितं कलश स्थापनादि करिष्ये ।
( असे म्हणून उजव्या हातात पळीने पाणी घेऊन ताम्हनात सोडतात. पूजेच्या वेळी प्रज्वलित केलेला हा दीप नऊ दिवस अखंड तेवत ठेवतात.)
तथाच आसनादि कलश-शंख - घंटापूजनं - दीपपूजनं करिष्ये । शरीरशुद्धयर्थ (श्रीपुरुषसूक्तेन ) षडंगन्यास च करिष्ये ।
आदौ निर्विघ्नतासिध्दयर्थ श्रीमहागणपतिपूजनं करिष्ये ।
( असे म्हणून उजव्या हाताने ताम्हनात पळीभर पाणी सोडतात.)
श्रीमहागणपति पूजन -
श्रीगणपतीचे प्रतीक म्हणून तांदुळ किंवा गहू यांच्या छोट्याशा राशीवर नारळ किंवा सुपारी ठेवून किंवा श्रीगणपतीची छोटीशी मूर्ती ठेवून त्यावर गंध,अक्षता, फु्ले इत्यदी वाहून पूजा करतात.
' सकलपूजार्थे गंधाक्षतापुष्पं समर्पयामि'।
नमस्कार करून नंतर
गणानां त्वा शौनको गृत्समदो गणपतिर्जगती । गणपत्यावाहने विनियोग: । ॐ गणानां त्वां गणपतिं हवामहे ।
कवि कवीनामुपमश्रवस्तमम‍। ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आन: । शृण्वन नूतिभिं: सीदसादनं ।
श्रीमन्महागणपतये नमो नम: । श्रीमहागणपतयै नम: आवाहनं समर्पयामि ॥ असे म्हणतात.
गणपतीवर अक्षता वाहून त्याला आसन - अर्ध्य इत्यादी उपचार अर्पण करतात.
नंतर दोन विड्याच्या पानांवर सुपारी ठेवून दक्षिणा अर्पण करतात. गणपतीची पूजा पूर्ण झाल्यावर 'कार्य मे सिध्दिमायातु प्रसन्ने त्वयि धातारि । विघ्नानि नाशमायान्तु सर्वाणि सुरनाय । ' अशी प्रार्थना करतात आणि ' श्रीमहागणपतये नमो नम: ।' असे म्हणून हात जोडतात.
आसन व वातावरणशुध्दी _ ॐ पृथ्वी त्वया धृता लोका देवि त्वं विष्णुनां धृता । त्वं च धारण मां देवि पवित्र कुरु चासनं ॥१॥
अपक्रामन्तु भूतानि पिशाचा: सर्वतो दिशम्‍ सर्वषाम विरोधेन पूजाकर्म समारभे ॥२॥
अपसर्पन्तु ते भूता ये भूता भूमिसंस्थिता: । ये भूता विघ्नकर्तारस्तेनश्यन्तु
शिवाज्ञया ॥३॥
असे म्हणून अक्षता घेऊन आपल्याभोवती चारी दिशांना फेकतात.
षडंगन्यास - ॐ यत्पुरुषं व्यदधु: कातिधाव्यकल्पयन्‍ मुखं किमस्य कौ बाहू का उरु
पादा उच्येते । हृदयाय नम:।
असे म्हणून हृदयाला हात लावतात.
ॐ ब्राह्मणोऽस्य मुखमासीत बाहू राजन्य: कृत: उरु तदस्य यद‍ वैश्य: पद्‍भ्यां शूद्रो अजायत । शिरसे स्वाहा।
असे म्हणून मस्तकाला स्पर्श करतात.
ॐ चंद्रमा मनसो जातश्चक्षो सूर्यो अजायत । मुखदिंदुश्चाग्निश्च प्राणाद्‍वायुरजायत
। शिखायै वषट्‍।
असे म्हणून शेंडीला स्पर्श करतात.
ॐ नाभ्या आसीदन्तरिक्षं शीष्णौद्यौ: समवर्तत पदभ्यां भूमिर्दिश: श्रोत्रात्तथा
लोकाँ अकल्पयन्‌ । कवचाय हुं ।
असेम्हणून दोन्ही हातांनी हृदयाच्या खालच्या बाजूला स्पर्श करतात.
ॐ सप्तास्यासन्‌ परिधयस्त्रिसप्त समिध: कृता:। देवा यज्ञज्ञं तन्वाना अबघ्नन्‌
पुरुषं पशुं । नेत्रत्रयाय वौषट्‍ । डोळ्यांना स्पर्श करावा ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त देवस्तानि धर्माणि प्रथमान्यासन । तेह नाकं महिमान: सचन्त यत्र पूर्वे साध्या सन्ति देवा: अस्त्राय फट्
असे म्हणून टाळी वाजवतात व 'इति दिग्बंध:' असे म्हणतात.
कलशपूजा - कलशस्य मुखे विष्णु: कंठे रुद्र: समाश्रित: मूले तु स्थितो ब्रह्मा
मध्ये मातृगणा: स्मृता: ॥
कुक्षौ तु सागरा: सर्वे सप्तद्वीपा वसुधरा । ऋग्वेदोऽथ यजुर्वेद: सामवेदो ह्यथर्वण:
। अंगैश्च सहिता: सर्वे कलशं तु समाश्रिताः ।
अत्र गायत्री सावित्री शांतिः पुष्टिकरी तथा । आयांतु देविपूजार्थ दुरितक्षयकारकाः ॥ गंगे च यमुने चैव गोदावरि सरस्वती । नर्मदे, सिंधु, कावेरि जलेऽस्मिन्‌ सन्निधिं कुरु ॥ श्रीवरुणाय नमः । सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पाणि समर्पयामि ॥ शुद्ध पाण्याने भरलेल्या कलशाला गंध, अक्षता व फुले वाहावी. शंखपुजा - शंखादौ चंद्रदैवत्यं कुक्षौ वरुणदेवता । पृष्ठे प्रजापतिश्चैव अग्रे गंगासरस्वती ॥ त्वं पुरा सागरोत्पन्नौ विष्णुना विधृतः करे । अग्रतः सर्वदेवानां पांचजन्य नमोऽस्तुते ॥ शंखदेवयायै नमः । सर्वोपचारार्थे गंध-पुष्प-तुलसीपत्रं समर्पयामि ॥ गंध, फुले, तुलसी शंखाला अर्पण करावी. घंटापूजा - आगमार्थं तु देवानां गमनार्थं तु रक्षसां । कुरु घंटाएवं तत्र देवताऽव्हानलक्षणम्‌ ॥ घंटायै नमः । सकलपूजार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि ॥ घंटेला गंध, अक्षता, फुले वाहावी व घंटा वाजवावी. दीपपूजा - भो दीप ब्रह्मरूपस्त्वं ज्योतिषां प्रभुरव्यः । अतस्त्वां स्थापयाम्यत्र मम शांतिप्रदो भवो ॥ दीपदेवतायै नमः । सकलपूजार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि ॥ असे म्हणून समईला गंध, अक्षता, फूल वाहून नमस्कार करतात.
मंडप पूजा -
घटस्थापना करावयाच्या जागी वर लहानशी मंडपी आंब्याचे डहाळे वगैरे नीट सुशोभित अशी तयार करतात. या मंडपीला देवतास्वरूपी मानून तिची पूजा करतात. श्री मंडपदेवतायै नमः । गंधाक्षतपुष्पं समर्पयामि ॥ (मंडपाला गंध, अक्षता, फुले वाहतात.)
प्रोक्षण -
अपवित्रः पवित्रो वा सर्वावस्थां गतोऽपि वा । यः स्मरेत् पुंडरीकाक्षं सबाह्याभ्यंतरः शुचिः ॥
(स्वतःच्या मस्तकावर व पूजासाहित्यावर तुलसीपत्राने किंवा फुलाने पाणी शिंपडतात.)
असे केल्यावर पूजाविधी संपूर्ण होतो.

नवरात्रीची आरती

आश्विनशुद्धपक्षी अंबा बैसलि सिंहासनी हो
प्रतिपदेपासून घटस्थापना ती करूनी हो।।
मूलमंत्रजप करूनी भोंवते रक्षक ठेवूनी हो
ब्रह्मा विष्णू रुद्र आईचें पूजन करिती हो ।।


उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो
उदोकारें गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो ।।

द्वितीयेचे दिवशी मिळती चौसष्ट योगिनी हो
सकळांमध्ये श्रेष्ठ परशुरामाची जननी हो ।।
कस्तुरीमळवट भांगी शेंदूर भरूनी हो
उदोकारें गर्जती सकल चामुंडा मिळूनी ।।उदो।।

तृतीयेचे दिवशी अंबे शृंगार मांडिला हो
पातळ चोळी कंठी हार मुक्ताफळां हो ।।
कंठीची पदके कांसे पीतांबर पिवळा हो
अष्टभूजा मिरविती अंबे सुंदर दिसे लीला हो ।।उदो।।

चतुर्थीच्या दिवशी विश्वव्यापक जननी हो
उपासकां पाहसी प्रसन्न अंतकरणी हो ।।
पूर्णकृपें जगन्माते मनमोहिनी हो
भक्तांच्या माऊली सूर ते येती लोटांगणी हो ।।उदो।।

पंचमीचे दिवशी व्रत ते उपांगललिता हो
अर्ध्यपाद्यपूजनें तुजला भवानी रतविती हो ।।
रात्रीचे समयी करिती जागरण हरिकथा हो
आनंदे प्रेम तें आले सद्भावे क्रीडतां हो ।।उदो।।

षष्ठीचे दिवशी भक्तां आनंद वर्तला हो
घेऊनि दिवट्या हस्तीं हर्षे गोंधळ घातला हो ।।
कवडी एक अर्पिता देशी हार मुक्ताफळा हो ।।उदो।।

सप्तमीचे दिवशी सप्तशृंगगडावरी हो
तेथे तूं नांदसी भोवती पुष्पे नानापरी हो ।।
जाईजुईसेवंती पूजा रेखियली बरवी हो
भक्त संकटी पडतां झेलुनि घेता वरचेवरी ।।उदो।।

अष्टमीचे दिवशी अष्टभूजा नारायणी हो
सह्याद्रीपर्वती पाहिली उभी जगज्जननी हो ।।
पहिलें शरण आलों तुजलागुनी हो
स्तनपान देऊनी सुखी केले अंतकरणी ।।उदो।।

नवमीचे दिवशी नव दिवसांचे पारणें हो
सप्तशतीजप होमहवनें सद्भक्ती करूनी हो ।।
षड्सअन्ने नैवेद्यासी अर्पियेली भोजनी हो
आचार्य ब्राह्मणां तृप्त केलें त्यां कृपेकरूनी हो।।उदो।।

दशमीच्या दिवशी अंबा निघे सीमोल्लंघनी हो
सिंहारूढ दारुण शस्त्रे अंबे त्वां घेऊनी हो ।।
शुभनिशुंभादिक राक्षसां किती मारिसी रणी हो
विप्रा रामदासा आश्रय दिधला तो चरणीं हो।।उदो।।

श्री देवी सूक्तम्

नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः।
नमः प्रकृत्यै भद्राये नियताः प्रणताः स्मताम्।।
रौद्राये नमो नित्यायै गौर्यै धात्र्यै नमोनमः।
ज्योत्स्नाये चेन्दुरूपिण्यै सुखायै सततं नमः।।
कल्याण्ये प्रणतां वृद्धयै सिद्धयै कुर्मो नमो नमः।
नैऋ्त्यै भूभृतां लक्ष्म्यै शर्वाण्यै ते नमो नमः।।
दुर्गाये दुर्गपारायै सारायै सर्वकारिण्यै।
ख्यात्यै तथैव कृष्णायै धूम्रायै सततं नमः।।
अतिसौम्यातिरौद्रायै नतास्तस्यै नमो नमः।
नमो जगत्प्रतिष्ठायै देव्यै कृत्यै नमो नमः।।
या देवी सर्वभूतेषु विष्णुमायेति शाब्दिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।।
या देवी सर्वभूतेषु चेतनेत्यभिधीयते।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।।
या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।।
या देवी सर्वभूतेषु निद्रारूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।।
या देवी सर्वभूतेषु क्षुधारूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।।
या देवी सर्वभूतेषु छायारूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।।
या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।।
या देवी सर्वभूतेषु तृष्णारूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।।
या देवी सर्वभूतेषु क्षान्तिरूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।।
या देवी सर्वभूतेषु जातिरूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।।
या देवी सर्वभूतेषु लज्जारूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।।
या देवी सर्वभूतेषू शान्तिरूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।।
या देवी सर्वभूतेषु श्रद्धारूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।।
या देवी सर्वभूतेषु कान्तिरूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।।
या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।।
या देवी सर्वभूतेषु वृत्तिरूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।।
या देवी सर्वभूतेषु स्मूतिरूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।।
या देवी सर्वभूतेषु दयारूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।।
या देवी सर्वभूतेषु तृष्टिरूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।।
या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।।
या देवी सर्वभूतेषु भ्रान्तिरूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।।
इन्द्रियाणामधिष्ठात्री भूतानां चाखिलेषु या।
भूतेषु सततं तस्यै व्याप्तिदेव्यै नमो नमः।।
चितिरूपेण या कृत्स्रमेतद्व्याप्य स्थिता जगत।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।।
स्तुता सुरैः पूर्वमभीष्टसंश्रयात्तथा सुरेन्द्रेण दिनेषु सेविता।
करोतु सा नः शुभहेतुरीश्वरी शुभानि भद्राण्यभिहन्तु चापदः।।

भोंडला/हादगा

नवरात्रीच्या काळात महाराष्ट्रात मुली संध्याकाळी भोंडला खेळतात. पाटावर हत्तीचे चित्र काढून त्याभोवती फेर धरण्याचा हा कार्यक्रम असतो. गुजराथमध्ये या काळात रात्री गरबा खेळतात.

`गरबा खेळणे म्हणजे काय ?

गरबा खेळणे यालाच हिंदु धर्मात टाळयांच्या लयबद्ध गजरात देवीचे भक्तिरसपूर्ण गुणगानात्मक भजन करणे, असे म्हणतात. गरबा खेळणे, म्हणजे टाळयांच्या माध्यमातून श्री दुर्गादेवीला ध्यानातून जागृत करून तिला ब्रह्मांडासाठी कार्य करण्यासाठी मारक रूप घेण्यास आवाहन करणे. टाळीच्या आघातातून तेजाची निर्मिती होते. त्यामुळे देवीच्या मारक रूपाला जागृत करणे शक्य होते. तसेच टाळया वाजवून गोलाकार फेर धरून देवीला आवाहन करणारी भक्तियुक्‍त भजने म्हटल्याने देवीप्रति भाव जागृत होण्यास मदत होते. गरब्याच्या वेळी गोलाकार फेर धरून केलेले मंडल हे घटाचे प्रतीक असते.

देवीची ओटी भरणे

अ. देवीला अर्पण करावयाची साडी सुती किंवा रेशमी असते; कारण या धाग्यांमध्ये देवतेकडून येणाऱ्या सात्त्विक लहरी ग्रहण करण्याची व धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत अधिक असते.
आ. दोन्ही हातांच्या ओंजळीत साडी, त्यावर खण व त्यावर नारळ (नारळाची शेंडी देवीच्या दिशेने येईल, असा) ठेवून, आपल्या हाताची ओंजळ छातीसमोर येईल, अशा पद्धतीने देवीसमोर उभे रहातात.
इ. देवीकडून चैतन्य मिळावे व आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी, यांसाठी देवीला भावपूर्ण प्रार्थना करतात.
ई. साडी, खण व नारळ देवीच्या चरणांवर अर्पण करावा. त्यानंतर तांदळाने तिची ओटी भरावी. तांदूळ हे सर्वसमावेशक असल्याने चैतन्य ग्रहण व प्रक्षेपण करण्यात अग्रेसर असतात. त्यामुळे प्राधान्याने तांदळाचा ओटीत समावेश केला जातो.
उ. त्यानंतर देवीच्या चरणांवरील वस्त्र तिचा प्रसाद म्हणून परिधान करावे व नारळ प्रसाद म्हणून ग्रहण करतात.

घागरी फुंकणे

नवरात्रीतील अष्टमीला देवीसमोर घागरी फुंकतात.

तांदुळाच्या पिठाचा मुखवटा

नवरात्रीतील अष्टमीला तांदुळाच्या पिठाचा मुखवटा असलेली देवीची उभी मूर्ती करून तिचे पूजन करतात

ShivSanskruti.com: गौरीपूजन

ShivSanskruti.com: गौरीपूजन: व्रतवैकल्यं, सणवारांना घेऊन येणारा श्रावण जाता जाता भाद्रपदाच्या आगमनाची वार्ता देऊन जातो. श्रावण, भाद्रपद यांच्याशी स्त्रियांचं खास जिव्हा...

Tuesday, September 23, 2014

गौरीपूजन

व्रतवैकल्यं, सणवारांना घेऊन येणारा श्रावण जाता जाता भाद्रपदाच्या आगमनाची वार्ता देऊन जातो. श्रावण, भाद्रपद यांच्याशी स्त्रियांचं खास जिव्हाळ्याचं नातं आहे त्यातही माहेरवाशिणींच खासं. आपल्या कुटुंबाच्या सुखासमाधानासाठी, सौख्यासाठी, समृद्धीसाठी, भरभराटीसाठी विविध पूजा, व्रते, संकल्प करण्याची गृहलक्ष्मीची परंपरा आजही चालु आहे आणि हेच तर आपल्या भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे.
माहेरवाशिणी ज्या दिवसाची आतुरतेने वर्षभर वाट पहात असतात, तो दिवस म्हणजे ज्येष्ठा गौरीआगमनाचा. जेव्हा लक्ष्मीला माहेरपणाचं सुख अनुभवावसं वाटतं तेव्हा ती गौर म्हणून येते, अशी कहाणी सांगितली जाते. माहेर ही गोष्टच मुळात स्त्रिला अतिशय जवळची आहे. त्यामुळेच गौरींच्या आगमनाची तयारी देखील घरोघरी अगदी पारंपारीक पद्धतीने करतात.
ज्येष्ठा नक्षत्रावर गौरींचे आगमन होते, अनुराधा नक्षत्रावर पूजन तर मूळ नक्षत्रावर विसर्जन केलं जाते. काही घरांत गौरींनाच ‘महालक्ष्मी’ असे म्हटले जाते. ज्येष्ठ नक्षत्रावर ही पूजा होते म्हणून ‘ज्येष्ठ गौरी’ असेही म्हणतात. महालक्ष्मी आणि गौरी किंवा ज्येष्ठा-कनिष्ठा, सखी-पार्वती अशा जोडीने त्या घरात आणल्या जातात. खड्याच्या गौरी, मुखवट्याच्या गौरी( शाडू, माती तसेच पितळी मुखवटे), तेरड्याच्या गौरी मोठ्या सजावटीसह घरोघरी बसवतात.
काही लोकांकडे परंपरेप्रमाणे पाणवठ्यावर जाऊन पाच खडे मुक्याने( तोंडात पाणी भरुन) आणून पूजन करतात तर काही ठिकाणी पाच मडक्यांची उतरंड किंवा भात मोजण्याचं माप घेतात. त्यावर गौरीचे मुखवटे बसवतात. हे दोन मुखवटे म्हणजे पार्वती व तिची सखी. काही लोकांकडे तेरड्याची गौर असते. एक गौर तांदूळ भरलेल्या तांब्यावर, दुसरी गहू भरलेल्या तांब्यावर तर काही घरांमध्ये सुपात बसवतात. तेरड्याची रोपे मुळासकट आणली जातात कारण ही मुळे म्हणजे गौरीची पावले समजली जातात. हल्लीच्या INSTANT च्या जमान्यासाठी त्यापुर्णपणे सजवून (अगदी साडी नेसवून) READY MADE मिळतात. काही घरात नवसाने बोललेले गौरींचे बाळ देखील मांडतात. आणताना पावलांच्या रांगोळ्या, हळदी-कुंकूवा च्या सड्यावरुन वाजत-गाजत आणतात. "गौरायी आली सोन्या-मोत्याच्या पावलांनी" असे म्हणतात.

अधिक माहिती साठी वाचा http://shivsanskruti.com

ऋषी पंचमी

अधिक माहिती साठी वाचा http://shivsanskruti.com

ऋषी पंचमी  माहिती आणि कथा 

-------------------------------------------------------------------------------------------------
मराठी सण / मराठी फेस्टिवल / मराठी फेस्टिवल्स (Marathi San / Marathi Festival / Marathi Festivals)  
-------------------------------------------------------------------------------------------------

फक्त आपल्या भारतातच नव्हे तर संपूर्ण विश्वात आपल्या ऋषीमुनींबद्दल आकर्षण आहे. अतीव आदर आहे. अशा या श्रेष्ठ, जेष्ठ, ज्ञानी ऋषींबद्दल आपणास वाटणारा आदर, निष्ठा, भक्ती व्यक्त करणे हेच ऋषीपंचमीचे प्रयोजन आहे.

गणपतीचे आगमन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच भाद्रपद शुद्ध पंचमीला ऋषीपंचमीचे व्रत करतात. या दिवशी स्त्रिया रजस्वला अवस्थेत असताना अजगातेपणी केलेल्या स्पर्शाचा दोष दूर करण्याकरीता अरुंधती, कश्यपादि ऋषींना प्रसन्न करण्यासाठी सप्तर्शीचे पूजन करतात. पूजा केल्यानंतर बैलांच्या श्रमाचे कोणतेही पदार्थ खात नाहीत. कंदमुळे खातात. ऋषीमुनी अरण्यात राहतात. अरण्यात उगवणारी कंदमुळे खाऊन ते आपले पोट भरतात. त्याची आठवण म्हणून आपण एक दिवस तरी नैसर्गिकरित्या तयार झालेले अन्न खावे व हा दिन साजरा करावा असा प्रघात आहे.

आपल्या हिंदू संस्कृतीत कश्यप, अत्रि, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी व वशिष्ठ ह्या ऋषीसप्तकाने म्हणजेच सप्तश्रींनी आपल्यासाठी ज्ञानाचे घडे भरून ठेवले आहेत. अशा या थोर विभूतींनी दाखविलेल्या मार्गावरून आचरण करण्याची कृतज्ञतापूर्वक प्रतिज्ञा करणे हाच ऋषीपंचमीचा उद्देश व संदेश आहे.

अधिक माहिती साठी वाचा http://shivsanskruti.com

गणेशोत्सव

अधिक माहिती साठी वाचा http://shivsanskruti.com

गणेशोत्सव हा हिंदू धर्मीयांचा एक सार्वजनिक उत्सव आहे. भारतीय समाजामध्ये एकी असावी ह्या उद्देशाने बाळ गंगाधर टिळकांनी ह्या उत्सवाला सार्वजनिक स्वरूप आणले. ह्या उत्सवात गणपतीची पूजा केली जाते.
हिंदू धर्मीयांचे आराध्य दैवत असलेल्या विघ्नहर्ता गणरायाचे आगमन भाद्रपद शुद्ध चतुर्थीस होते. व दहा दिवस मोठ्या उत्साहाने हा उत्सव साजरा करण्यात येतो.

अधिक माहिती साठी वाचा http://shivsanskruti.com

गणपतीची जन्मकथा 

एकदा पार्वती मातेस स्नान करण्यास जावयाचे असताना बाहेर कोणीच राहण्याकरता नसल्यामुळे तिने मातीची मूर्ती करून ती जिवंत केली व पहारेकरी नेमून कोणालाही आतमध्ये येऊ देऊ नको असे सांगून पार्वतीमाता स्नानास निघून गेली.
काही वेळाने भगवान शंकर तिथे आले व आत जाऊ लागले. पहारेकऱ्याने त्यांना रोखले. भगवान शंकर संतप्त होऊन त्यांनी पहारेकऱ्याचे शिरच उडवले.
पार्वतीमाता स्नान करून परत आल्यावर पहारेकऱ्याला मारलेले पाहून अतिशय संतापली. तेव्हा शंकरांनी आपल्या गण नावाच्या शिष्याला बाहेर जाऊन जो कोणी भेटेल त्या प्राण्याचे डोके कापून घेऊन ये असा आदेश दिला. गण बाहेर पडल्यावर त्याला एक हत्ती दिसला. त्याचे मस्तक कापून तो घेऊन आला. भगवान शंकरांनी ते मस्तक पुतळयाला लावले व जिवंत केले. हा पार्वतीमातेचा मानस पुत्र गज (हत्ती) आनन (मुख) असलेला गजानन होय. भगवान शंकराच्या गणाचा ईश म्हणजे परमेश्वर म्हणून गणेश हे नाव ठेवले. हा दिवस चतुर्थीचा होता. त्यामुळे चतुर्थीस गणेश चतुर्थी म्हणून महत्त्व आहे.
या दिवशी भक्तगण श्रीगणेशाची पूजा, प्रार्थना व तसेच उपवास करून भक्ती करतात. भाद्रपद चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत महाराष्ट्रात फार मोठा उत्सव साजरा होत असतो. श्रीगणेशाचे वास्तव्य या काळात मानण्यात येऊन गणेशाच्या उपस्थितीत अनेक धार्मिक व सामाजिक सार्वजनिक कार्यक्रम केले जातात. सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात लोकमान्य टिळकांनी केली.

अधिक माहिती साठी वाचा http://shivsanskruti.com

सार्वजनिक गणेशोत्सव

इंग्रजांच्या काळात भारतीय संस्कृती लयास जात होती, तसेच लोक एकत्र येत नव्हते. लोकमान्य टिळकांना वाटे कि स्वातंत्र्यासाठी लोकांनी एकत्र यायला हवेच त्यासाठी त्यांनी सार्वजनिक गणेश उत्सव सुरु केला आणि त्यातुन प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला. परंतु आज गणेश उत्सवाला वेगळेच रूप आलेले आपल्य लक्ष्यात येते..

अधिक माहिती साठी वाचा http://shivsanskruti.com

विसर्जन

मूर्तिविसर्जनाचा मंत्र : पुढील मंत्र मूर्तीचे विसर्जन करण्यापूर्वी म्हणतात. ’यान्तु देवगणा: सर्वे पूजामादाय पार्थिवात् ।इष्टकामप्रसिद्ध्यर्थं पुनरागमनाय च’ ।। ;अर्थ : ’पार्थिव (मातीच्या) मूर्तीची मी आजपर्यंत केलेली पूजा सर्व देवगणांनी स्वीकारावी आणि ईप्सित कार्याच्या सिद्धीसाठी अन् पुन्हा येण्यासाठी आता प्रस्थान करावे.’ श्री महागणपतिपूजन केलेल्या नारळावर, तसेच उमामहेश्‍वर आणि श्री सिद्धिविनायक यांच्यावर अक्षता वाहून मूर्ती स्थानापासून थोडी हलवतात. त्यानंतर जलाशयात तिचे विसर्जन करतात.
इंग्रजांचे अंधानुकरण करणाऱ्या भारतीयांबद्दल टिळकांना अत्यंत चीड होती. ते म्हणत, "आपले काही तथाकथित शिक्षित देशबांधव साहेबांची पिण्यात बरोबरी करू शकतात, पण साहेबांची भारताच्या राज्यकारभारातील जागा मिळविण्याची महत्त्वाकांक्षा ते बाळगू शकतात का?" [१८] त्यांच्या मते भारतीयांच्या दुर्बलतेची कारणे त्यांचा हरवलेला आत्मविश्वास आणि एकीची भावना ही होती आणि जोपर्यंत लोकांचा त्यांच्या धर्म, संस्कृती आणि इतिहासाबद्दलचा आदर परत वृद्धिंगत होत नाही तोपर्यंत राजकीय आणि सामाजिक स्वातंत्र्याच्या गप्पा मारणे व्यर्थ आहे. त्यांच्या ग्रीक संस्कृतीच्या अभ्यासातून त्यांना असे जाणवले की, ज्युपिटर देवाच्या स्मरणार्थ दर चार वर्षांनी साजरे होणारे ऑलिंपिक खेळ विविध ग्रीक राज्यांना एकत्र आणण्यात यशस्वी ठरले होते. याच धर्तीवर इ.स. १८९३ मध्ये त्यांनी जुन्या काळापासून प्रस्थापित गणेशोत्सवाचे नव्या स्वरूपात पुनरूज्जीवन केले. हिंदूंमध्ये घराघरांत गणेशोत्सव अनेक शतकांपासून साजरा केला जात असे. पण टिळकांनी त्याला एका दहा दिवस चालणाऱ्या सामाजिक महोत्सवाचे स्वरूप दिले. यामागे त्यांचे दोन उद्देश होते. एक म्हणजे या उत्सवाने ब्रिटिश-विरोधी मतप्रचारासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे आणि दुसरे म्हणजे याद्वारे हिंदू समाज जवळ येऊन त्यांच्यातील एकोपा वाढीस लागावा. १८९३च्या मुंबई आणि पुण्यातील हिंदू-मुस्लिम दंगलींमध्ये सरकारने मुस्लिमांची बाजू घेतली असे त्यांचे स्पष्ट मत होते व त्या पार्श्वभूमीवर हिंदूंना एकत्र करणे त्यांना गरजेचे वाटत होते. अनेक साम्राज्यांप्रमाणे इंग्रजाचा राजकीय बैठकींना विरोध होता पण धर्माच्या बाबतीत ते दोन हात दूर राहणेच पसंत करत. याचा फायदा टिळकांनी गणेशोत्सवाच्या पुनरुज्जीवनासाठी करून घेतला. थोड्याच अवधीत गणेशोत्सव सर्वदूर पोहोचला आणि अनेक लहान-मोठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे स्थापित झाली. अशा रितीने धार्मिक पातळीवर लोकांना यशस्वीरीत्या एकत्र आणल्यानंतर टिळकांनी धर्मनिरपेक्ष विषयांवर लोकांना एकत्रित करण्याचे प्रयत्न चालू केले. जिच्या अनुकरणाने लोकांमधील आत्मविश्वास परत येऊ शकेल असा त्यांना विश्वास वाटला, अशा शिवाजी महाराजांच्या स्वरूपात त्यांना एक आदर्श व्यक्ती दिसली. शिवाजी महाराज संपूर्ण महाराष्ट्राचे आदर्श होते, याचा फायदा करून घेऊन टिळकांनी महाराष्ट्रात शिवजयंतीची सुरुवात तर केलीच, शिवाय भारतभर दौरे करून लोकांना शिवजयंती साजरी करण्याचे आवाहन केले. त्यानंतर विशेषतः बंगालमध्ये शिवजयंतीचा उत्सव जोराने सुरू झाला

अधिक माहिती साठी वाचा http://shivsanskruti.com

गणेश चतुर्थी

अधिक माहिती साठी वाचा http://shivsanskruti.com

पुराणानुसार

शिवपुराणमें भाद्रपद मास के कृष्णपक्ष की चतुर्थी को मंगलमूर्तिगणेश की अवतरण-तिथि बताया गया है जबकि गणेशपुराणके मत से यह गणेशावतार भाद्रपद शुक्ल चतुर्थी को हुआ था। गण + पति = गणपति। संस्कृतकोशानुसार ‘गण’ अर्थात पवित्रक। ‘पति’ अर्थात स्वामी, ‘गणपति’ अर्थात पवित्रकोंके स्वामी। 

कथा

शिवपुराणके अन्तर्गत रुद्रसंहिताके चतुर्थ (कुमार) खण्ड में यह वर्णन है कि माता पार्वती ने स्नान करने से पूर्व अपनी मैल से एक बालक को उत्पन्न करके उसे अपना द्वारपालबना दिया। शिवजी ने जब प्रवेश करना चाहा तब बालक ने उन्हें रोक दिया। इस पर शिवगणोंने बालक से भयंकर युद्ध किया परंतु संग्राम में उसे कोई पराजित नहीं कर सका। अन्ततोगत्वा भगवान शंकर ने क्रोधित होकर अपने त्रिशूल से उस बालक का सर काट दिया। इससे भगवती शिवा क्रुद्ध हो उठीं और उन्होंने प्रलय करने की ठान ली। भयभीत देवताओं ने देवर्षिनारद की सलाह पर जगदम्बा की स्तुति करके उन्हें शांत किया। शिवजी के निर्देश पर विष्णुजीउत्तर दिशा में सबसे पहले मिले जीव (हाथी) का सिर काटकर ले आए। मृत्युंजय रुद्र ने गज के उस मस्तक को बालक के धड पर रखकर उसे पुनर्जीवित कर दिया। माता पार्वती ने हर्षातिरेक से उस गजमुखबालक को अपने हृदय से लगा लिया और देवताओं में अग्रणी होने का आशीर्वाद दिया। ब्रह्मा, विष्णु, महेश ने उस बालक को सर्वाध्यक्ष घोषित करके अग्रपूज्यहोने का वरदान दिया। भगवान शंकर ने बालक से कहा-गिरिजानन्दन! विघ्न नाश करने में तेरा नाम सर्वोपरि होगा। तू सबका पूज्य बनकर मेरे समस्त गणों का अध्यक्ष हो जा। गणेश्वर!तू भाद्रपद मास के कृष्णपक्ष की चतुर्थी को चंद्रमा के उदित होने पर उत्पन्न हुआ है। इस तिथि में व्रत करने वाले के सभी विघ्नों का नाश हो जाएगा और उसे सब सिद्धियां प्राप्त होंगी। कृष्णपक्ष की चतुर्थी की रात्रि में चंद्रोदय के समय गणेश तुम्हारी पूजा करने के पश्चात् व्रती चंद्रमा को अ‌र्घ्यदेकर ब्राह्मण को मिष्ठान खिलाए। तदोपरांत स्वयं भी मीठा भोजन करे। वर्षपर्यन्तश्रीगणेश चतुर्थी का व्रत करने वाले की मनोकामना अवश्य पूर्ण होती है।

अन्य कथा

उत्सव में एक गणेश प्रतिमा विसर्जन के लिए ले जाते हुए।
एक बार महादेवजी पार्वती सहित नर्मदा के तट पर गए। वहाँ एक सुंदर स्थान पर पार्वती जी ने महादेवजी के साथ चौपड़ खेलने की इच्छा व्यक्त की। तब शिवजी ने कहा- हमारी हार-जीत का साक्षी कौन होगा? पार्वती ने तत्काल वहाँ की घास के तिनके बटोरकर एक पुतला बनाया और उसमें प्राण-प्रतिष्ठा करके उससे कहा- बेटा! हम चौपड़ खेलना चाहते हैं, किन्तु यहाँ हार-जीत का साक्षी कोई नहीं है। अतः खेल के अन्त में तुम हमारी हार-जीत के साक्षी होकर बताना कि हममें से कौन जीता, कौन हारा?
खेल आरंभ हुआ। दैवयोग से तीनों बार पार्वती जी ही जीतीं। जब अंत में बालक से हार-जीत का निर्णय कराया गया तो उसने महादेवजी को विजयी बताया। परिणामतः पार्वती जी ने क्रुद्ध होकर उसे एक पाँव से लंगड़ा होने और वहाँ के कीचड़ में पड़ा रहकर दुःख भोगने का शाप दे दिया।
बालक ने विनम्रतापूर्वक कहा- माँ! मुझसे अज्ञानवश ऐसा हो गया है। मैंने किसी कुटिलता या द्वेष के कारण ऐसा नहीं किया। मुझे क्षमा करें तथा शाप से मुक्ति का उपाय बताएँ। तब ममतारूपी माँ को उस पर दया आ गई और वे बोलीं- यहाँ नाग-कन्याएँ गणेश-पूजन करने आएँगी। उनके उपदेश से तुम गणेश व्रत करके मुझे प्राप्त करोगे। इतना कहकर वे कैलाश पर्वत चली गईं।
एक वर्ष बाद वहाँ श्रावण में नाग-कन्याएँ गणेश पूजन के लिए आईं। नाग-कन्याओं ने गणेश व्रत करके उस बालक को भी व्रत की विधि बताई। तत्पश्चात बालक ने 12 दिन तक श्रीगणेशजी का व्रत किया। तब गणेशजी ने उसे दर्शन देकर कहा- मैं तुम्हारे व्रत से प्रसन्न हूँ। मनोवांछित वर माँगो। बालक बोला- भगवन! मेरे पाँव में इतनी शक्ति दे दो कि मैं कैलाश पर्वत पर अपने माता-पिता के पास पहुँच सकूं और वे मुझ पर प्रसन्न हो जाएँ।
गणेशजी 'तथास्तु' कहकर अंतर्धान हो गए। बालक भगवान शिव के चरणों में पहुँच गया। शिवजी ने उससे वहाँ तक पहुँचने के साधन के बारे में पूछा।
तब बालक ने सारी कथा शिवजी को सुना दी। उधर उसी दिन से अप्रसन्न होकर पार्वती शिवजी से भी विमुख हो गई थीं। तदुपरांत भगवान शंकर ने भी बालक की तरह २१ दिन पर्यन्त श्रीगणेश का व्रत किया, जिसके प्रभाव से पार्वती के मन में स्वयं महादेवजी से मिलने की इच्छा जाग्रत हुई।
वे शीघ्र ही कैलाश पर्वत पर आ पहुँची। वहाँ पहुँचकर पार्वतीजी ने शिवजी से पूछा- भगवन! आपने ऐसा कौन-सा उपाय किया जिसके फलस्वरूप मैं आपके पास भागी-भागी आ गई हूँ। शिवजी ने 'गणेश व्रत' का इतिहास उनसे कह दिया।
तब पार्वतीजी ने अपने पुत्र कार्तिकेय से मिलने की इच्छा से 21 दिन पर्यन्त 21-21 की संख्या में दूर्वा, पुष्प तथा लड्डुओं से गणेशजी का पूजन किया। 21वें दिन कार्तिकेय स्वयं ही पार्वतीजी से आ मिले। उन्होंने भी माँ के मुख से इस व्रत का माहात्म्य सुनकर व्रत किया।
कार्तिकेय ने यही व्रत विश्वामित्रजी को बताया। विश्वामित्रजी ने व्रत करके गणेशजी से जन्म से मुक्त होकर 'ब्रह्म-ऋषि' होने का वर माँगा। गणेशजी ने उनकी मनोकामना पूर्ण की। ऐसे हैं श्री गणेशजी, जो सबकी कामनाएँ पूर्ण करते हैं।

तीसरी कथा

Clay Ganesh Murti, Ganesh Chaturthi.JPG
एक बार महादेवजी स्नान करने के लिए भोगावती गए। उनके जाने के पश्चात पार्वती ने अपने तन के मैल से एक पुतला बनाया और उसका नाम 'गणेश' रखा। पार्वती ने उससे कहा- हे पुत्र! तुम एक मुगदल लेकर द्वार पर बैठ जाओ। मैं भीतर जाकर स्नान कर रही हूँ। जब तक मैं स्नान न कर लूं, तब तक तुम किसी भी पुरुष को भीतर मत आने देना।
भोगावती में स्नान करने के बाद जब भगवान शिवजी आए तो गणेशजी ने उन्हें द्वार पर रोक लिया। इसे शिवजी ने अपना अपमान समझा और क्रोधित होकर उनका सिर धड़ से अलग करके भीतर चले गए। पार्वती ने उन्हें नाराज देखकर समझा कि भोजन में विलंब होने के कारण महादेवजी नाराज हैं। इसलिए उन्होंने तत्काल दो थालियों में भोजन परोसकर शिवजी को बुलाया।
तब दूसरा थाल देखकर तनिक आश्चर्यचकित होकर शिवजी ने पूछा- यह दूसरा थाल किसके लिए है? पार्वती जी बोलीं- पुत्र गणेश के लिए है, जो बाहर द्वार पर पहरा दे रहा है।
यह सुनकर शिवजी और अधिक आश्चर्यचकित हुए। तुम्हारा पुत्र पहरा दे रहा है? हाँ नाथ! क्या आपने उसे देखा नहीं? देखा तो था, किन्तु मैंने तो अपने रोके जाने पर उसे कोई उद्दण्ड बालक समझकर उसका सिर काट दिया। यह सुनकर पार्वती जी बहुत दुःखी हुईं। वे विलाप करने लगीं। तब पार्वती जी को प्रसन्न करने के लिए भगवान शिव ने एक हाथी के बच्चे का सिर काटकर बालक के धड़ से जोड़ दिया। पार्वती जी इस प्रकार पुत्र गणेश को पाकर बहुत प्रसन्न हुई। उन्होंने पति तथा पुत्र को प्रीतिपूर्वक भोजन कराकर बाद में स्वयं भोजन किया।
यह घटना भाद्रपद शुक्ल चतुर्थी को हुई थी। इसीलिए यह तिथि पुण्य पर्व के रूप में मनाई जाती है।
चित्र:श्री गणेश मंदिर, झाँसी.JPG
श्री गणेश मंदिर, झाँसी
== व्रत ==
थाइलैंड में गणेश प्रतिमा
भाद्रपद-कृष्ण-चतुर्थी से प्रारंभ करके प्रत्येक मास के कृष्णपक्ष की चंद्रोदयव्यापिनीचतुर्थी के दिन व्रत करने पर विघ्नेश्वरगणेश प्रसन्न होकर समस्त विघ्न और संकट दूर कर देते हैं।

चंद्र दर्शन दोष से बचाव

प्रत्येक शुक्ल पक्ष चतुर्थी को चन्द्रदर्शन के पश्चात्‌ व्रती को आहार लेने का निर्देश है, इसके पूर्व नहीं। किंतु भाद्रपद शुक्ल पक्ष की चतुर्थी को रात्रि में चन्द्र-दर्शन (चन्द्रमा देखने को) निषिद्ध किया गया है।
जो व्यक्ति इस रात्रि को चन्द्रमा को देखते हैं उन्हें झूठा-कलंक प्राप्त होता है। ऐसा शास्त्रों का निर्देश है। यह अनुभूत भी है। इस गणेश चतुर्थी को चन्द्र-दर्शन करने वाले व्यक्तियों को उक्त परिणाम अनुभूत हुए, इसमें संशय नहीं है। यदि जाने-अनजाने में चन्द्रमा दिख भी जाए तो निम्न मंत्र का पाठ अवश्य कर लेना चाहिए-
'सिहः प्रसेनम्‌ अवधीत्‌, सिंहो जाम्बवता हतः। सुकुमारक मा रोदीस्तव ह्येष स्वमन्तकः॥'