Tuesday, September 23, 2014

वटसावित्री

                          वटसावित्री
जेष्ठ मासातील पौर्णिमेला वटसावित्री हे व्रत हिंदू स्त्रिया आपल्या पतीच्या आयुष्यमय मंगल जीवनासाठी आणि दीर्घायुष्यासाठी  करतात,अखंडसौभाग्यासाठी हे व्रत करतात.जेष्ठ शुद्ध त्रयोदशीपासून तीन दिवस म्हणजेच पौर्णिमेपर्यंत हे त्रिरात्र व्रत करतात .जेष्ठ पौर्णिमा हा दिवस या व्रतातील मुख्य दिवस असतो. आजच्या काळात तीनदिवस उपवास करणे कोणाला शक्य होत नाही त्यामुळे फक्त पौर्णिमेला हे व्रत केले जाते. पुराणात असे म्हटले आहे कि सावित्रीचा पती सत्यवान याचे प्राण वडाच्या झाडाखाली गेले होते तिने आपल्या पतिचे प्राण यमदेवाकडून परत आणले,वडाच्याच झाडाखाली सत्यवान पुन्हा जिवंत झाला. वटपौर्णिमेला  सत्यवान, सावित्री आणि  यमा यांच्या चित्रांची पुजा वडाच्या झाडाखाली करावी. महाराष्ट्रीयन स्त्रिया या वटवृक्षाची पुजा करतात कारण असे मानले जाते कि वडाच्या विविध अंगामध्ये श्री ब्रम्हा विष्णू महेश आणि सावित्री यांचे वास्तव्य असते.
वडाच्या झाडाची पुजा
प्रातःकाळी उठून स्नान करून सौभाग्यालंकार
धारण करतात.नंतर घरातील देवतांची पुजा केली जाते . एका तबकात पुजा साहित्य म्हणजेच गंध हळद,कुंकु,बेल,फुल अक्षदा ,धूप ,अगरबत्ती,विड्याची दोन पाने,सुपारी,नारळ वाटी,हळकुंड ,बदाम,खारीक आणि सुताचा धागा,खनाचे पीस ,हिरवा चुडा  आणि ओटी च समान (गहू ,५/७ आंबे ),एक पाण्याचा वाडगा घेऊन आपल्या घरातील किंवा एखाद्या  वडाच्या झाडाची पुजा करायला जातात.
प्रथम वडाच्या मुळाशी पाणी घालतात नंतर विड्याच्या पानावर सुपारीची गणपती म्हणून पुजा करतात .वडाची पुजा करतात वडाला ओटी अर्पण करतात . सुताच्या धाग्याने वडाच्या झाडाला सातवेळा वेष्ठन घालतात, आरती करुण नेव्यद्य धाखावतात.सात जन्म हाच पती मला दे अशी प्रार्थना करतात .नंतर सवाष्णींना हळदीकुंकू लावून ओटी भरतात. सत्यवानसावित्री यांची कथा वाचतात.
बंगाल मध्ये या दिवशी सुवासिनी आपल्या पतीची पुजा करून त्याला नवीन वस्त्र देतात.
उत्तर भारतात जेष्ठातील अमावस्येला हे व्रत करतात .

 व्रत कथा
मद्र देशाचा राजा अश्वपती ह्याला संतान नव्हते. संतानप्राप्तीसाठी त्याने ब्रम्हपत्नी सावित्रीचे (सूर्या हिचे) पुरश्चरण केले. सावित्रीच्या कृपाप्रसादाने त्याला कन्या झाली. त्यामुळे तिचे नाव त्याने सावित्री असेच ठेवले. ती उपवर झाल्यावर तिच्या विलक्षण तेजस्वीपणामुळे कोणीही राजपुत्र तिला मागणी घालीत नाही असे पाहून राजाने तिला वरसंशोधनार्थ पाठविले. तिने शाल्व देशाधिपती द्युमत्सेनाचा पुत्र सत्यवान ह्यास वर म्हणून निवडले. द्युमत्सेन राज्यभ्रष्ट होऊन अंधावस्थेत पत्नी ह्यांच्यासह अरण्यात राहात होता. सावित्रीने आपली निवड पित्यास सांगितली, तेव्हा देवर्षी नारदही तेथे होतेच. त्यांनी सत्यवान हा अल्पायुषी असून बरोबर एक वर्षाने त्याचा मृत्युयोग असल्याचे सांगितले. परंतु दृढनिश्चयी सावित्रीने सत्यवानाशीच विवाह केला आणि राजवैभव त्यामागून ती अरण्यात गेली. आपल्या सत्शील वागणुकीने व प्रेमळ स्वभावाने तिने सर्वांना आपलेसे केले. सत्यवानाच्या मृत्यूच्या तीन रात्री आधी तिने उपवास करून मनोभावे ईशचिंतन केले. पौर्णिमेच्या दिवशी लाकडे तोडण्यासाठी निघालेल्या सत्यवानाबरोबर ती आग्रहाने अरण्यात गेली. तो लाकडे तोडीत असतानाच वटवृक्षाखाली मूर्च्छित पडला. त्याला शुद्घीवर आणण्याचा प्रयत्न सावित्री करीत असतानाच प्रत्यक्ष यम सत्यवानाचे प्राण हरण करण्यासाठी तेथे आला. प्राण हरण करून तो परत जाऊ लागताच सावित्रीही त्याच्या मागे जाऊ लागली. यमाचे व तिचे बराच वेळ संभाषण झाले. आपल्या वाकचातुर्याने आणि युक्तिवादाने तिने यमाकडून आपल्या सासऱ्याची दृष्टी व राजवैभव, पित्याला पुत्रप्राप्ती आणि स्वतःलाही पुत्रप्राप्ती असे वर मागून घेतले. वैधव्यदशेत पुत्रप्राप्ती कशी होणार? असा पेच तिने निर्माण केला आणि सत्यवानास जिवंत करावयास यमाला भाग पाडले. अखेरीस यमाने सावित्रीच्या पतिभक्तीची स्तुती करून सत्यवानास जिवंत केले.

भारतीय पुराणकथांत अनेक पतिव्रतांची आख्याने असली, तरी सावित्रीच सर्वोत्तम आदर्श ठरली आहे. सुवासिनीला आशीर्वाद देताना जन्मसावित्री होअसा तो देण्याचा प्रघात आहे. सावित्री ही अखंड सौभाग्याचे प्रतीक ठरली आहे.
for more detail please visit http://shivsanskruti.com


No comments:

Post a Comment