नागपंचमी
श्रावण मासी हर्ष
मानसी हिरवळ दाटे चोहिकडे,
क्षंणात येते सर सर
शिरवे क्षंणात फिरुनि ऊन पडे
श्रावण महिन्यात सणांची आणि व्रता ची सुरुवात होते.ह्या महिन्यात उपवास केला
जातो.श्रावण महिन्यातील श्रावण शुद्ध पंचमीला ‘नागपंचमी’हा सन येतो. नागपंचमी हा पहिला
सन ह्या सनापासूनच सणांना सुरुवात होते .ह्या दिवशी घरोघरी नागाची पुजा केली जाते.
नागाला दुध आणि लाह्यांचा नेवेद्य धाखाविला जातो.
नागपंचमी च्या सुद्धा विविध कथा सांगितल्या जातात.
आपल्याला कालियामर्दन माहित आहेच भगवान श्रीकृष्णांनि यमुनेच्या डोहातील कालिया
नागाचे मर्दन करून गोकुळ वासियांना त्याच्या पासून वाचविले तो दिवस श्रावण शुद्ध
पंचमीचाच होता.
पुराणामध्ये हि अशी कथा आहे कि तक्षक नावाच्या नागाने केलेल्या अपराधाबद्दल
शिक्षा म्हणून राजा जनमेजयान याने सर्प यज्ञाला सुरुवात केली त्यामध्ये त्याने
अनेक सर्पांची आहुती दिली ,सर्पांची कमी होणारी संख्या बघून आस्तिक ऋषींनी राजा जनमेजयाला प्रसन्न करून घेतले आणि त्याला
वर म्हणून सर्पयज्ञ थांबवण्यासाठी सांगितले तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता
म्हणून त्या दिवशी नागपंचमी हा सन साजरा करून नागांची ,सापाची पुजा केली जाते .
नागपंचमीची आणखी एक कथा अशी आहे कि , एका राज्यात एक गरीब शेतकरी होता तो
आपल्या शेतात नागरणी करत असताना नागाची तीन पिले चिरडून मेली त्यामुळे सूड भावनेने
त्या नागिणीने त्या शेतकऱ्याला मारण्यास गेली शेतकऱ्याच्या दोन मुलालांना, बायकोला
आणि शेतकऱ्याला मारून ती त्याच्या मुलीला मारण्यास निघाली हे पाहून त्या मुलीने
नागीणीला वाटीमध्ये दुध दिले आणि नमस्कार करून तिची क्षमा मागितली तीचावर प्रसन्न
होऊन नागिणीने तिच्या आईवडिलांना आणि भावांना जिवंत केले तो दिवस श्रावण शुक्ल
पंचमीचा होता.म्हणून या दिवशी नागादेवतांचा कोप दूर करण्यासाठी नागोबाची पुजा
करतात .ह्या दिवशी शेतकरी शेतात नांगर चालवत नाहीत, घरात कोणतीही भाजी चिरत वा
कापत नाहीत .चुलीवर तवा ठेवत नाहीत .असे नियम पाळले जातात.
नागपंचमीची अशी हि एक कथा आहे कि, पाच युगांपूर्वी सत्तेश्वरी आणि सत्तेश्वर
असे दोघे बहिणभाऊ होते,नागपंचमीच्या आदल्या दिवशी सत्तेश्वरी चा भाऊ सत्तेश्वर
याचा मृत्यू झाला त्या शोकात तिने अन्न खाल्ले नाही त्या मुळे त्या दिवशी स्त्रिया
आपल्या भावाला चिरंतन आयुष्य आणि सर्व संकटातून मुक्ती मिळावी आपल्या भावाचे
देवांनी रक्षण करावे म्हणून उपवास करतात .
सत्तेश्वरीला नागरुपात स्वतःच्या भावाचे दर्शन झाले त्यावेळी नागदेवतेने तिला
असे वचन दिले कि जी बहिण माझी भाऊ म्हणून पुजा करेन तिचे मी रक्षण करेन .त्यामुळे
स्त्रिया नागाची पुजा करून नागपंचमी हा सन साजरा करतात .
सत्तेश्वरीचा भावाबद्दल चा शोक दूर करण्यासठी तिला प्रसन्न होऊन नवनवीन वस्त्र
आणि अलंकार देऊन तिला सजवले ते पाहून सत्तेश्वर समाधानी झाला. त्यामुळे नागपंचमीला
स्त्रिया नवीन वस्त्रे आणि अलंकार परिधान करतात.
सत्तेश्वर नागराजाच्या स्वरुपात सत्तेश्वरी समोर आला तो निघून जाऊ नये म्हणून
तिने त्याच्या कडून वाचन घेतले.त्या वाचन मुळे तिच्या हातावर एक वाचनचिन्ह निर्माण
झाले .त्या वचनाचे प्रतिक म्हणून स्त्रिया नागपंचमीच्या आदल्या दिवशी हातावर
मेहंदी काढतात.
दुसऱ्यादिवशी सत्तेश्वरीला तिचा भाऊ दिसला नाही त्याला शोधत शोधत ती जंगलात
गेली,तिला तिथे नागरुपात आपला भाऊ सत्तेश्वर दिसला त्याला पाहून ती आनंदाने
झाडाच्या फांद्यांवर झोके घेत होती, त्यामुळे स्त्रिया नागपंचमीच्या दिवशी झोके
खेळतात.गाणी गातात. आपल्या माहेरचं,भावाचं कौतुक करतात .
सणामंदी सण नागपंचमी
खेळायची
वाट पाहते बोलायाची
एकादस पारणं बहीण धरते भावाचं
वाट पाहते बोलायाची
एकादस पारणं बहीण धरते भावाचं
नागोबा देवाचं काय होईल जिवाचं
पंचमीच्या दिवशी नागोबाला पऊतं
सोड कुणब्या आऊत
पंचमीचा सण नागाला दूध लाह्या
आऊक्ष मागूया भाऊराया
नागपंचमीला स्त्रिया घरात देवाजवळ
पाटावर गंधाने किंवा रक्तचंदनाने नागाची प्रतिमा काढतात नाहीतर नागाच्या मूर्तींची
पुजा करून दुध लाह्यांचा आणि गुळ फुटाण्याचा नेव्येद्य दाखवतात. गावात किंवा
जवळपास वारूळ असेल तर तेथे पुजा करायला जातात.
.jpg)

.jpg)

No comments:
Post a Comment