Tuesday, September 23, 2014

गोकुळाष्टमी

गोकुळाष्टमी
तीन लोक के स्वामी "श्री हरि" प्रगट्यो बन यदुराई
नन्द गाँव में जसुदा नाई जायो क्रिशन कन्हाई
श्रावण वद्य अष्टमीला भगवान श्री कृष्णाचा जन्म मध्यरात्री झाला होता.दुष्ट कंसाचा वध करण्यासाठी भगवान विष्णूंनी,श्री कृष्णाच्या रुपात देवकीच्या पोटी जन्म घेतला.श्रीकृष्णाचे  कंसा पासून रक्षण करण्यासाठी वसुदेवाने त्याला गोकुळातील नंद आणि यशोदा यांच्याकडे  दिले. श्री कृष्णाचा जन्म झालेला पाहून गोकुळ वासी खूप आनंदी झाले म्हणून या दिवसाला कृष्णजयंती , गोकुळाष्टमी,कृष्णाष्टमी अशी विविध नावाने ओळखतात.
 गोकुळाष्टमीला उपवास करतात,रात्री जागरण करतात, भगवान श्रीकृष्णाच्या विविध कथा वाचतात,कीर्तने करतात. भगवान श्री कृष्णाची पुजा करतात, सुंठवडी प्रसाद म्हणून वाटतात.
गोकुळाष्टमीच्या दुसऱ्या दिवशी गोपाळकाला
साजरी करतात. 
वैष्णव संप्रदायाचा गोकुळाष्टमी हा  सणांमधील सर्वात महत्वाचा एक सन आहे.
मथुरा,गोकुळ,द्वारका,पुरी आणि वृंदावन या ठिकाणी मोठ्या उत्सवात गोकुळाष्टमी साजरी  केली जाते.

    

No comments:

Post a Comment