रामनवमी
गुढीपाडव्याच्या नऊ दिवसानंतर म्हणजेच चैत्र शुद्ध नवमी हा हिंदू पंचांगातील चैत्रातील नवरात्राचा नववादिवस येतो. याच दिवशी प्रभू श्रीरामांचा जन्म झाला. या दिवसाला रामनवमी म्हणून साजरी करतात. यादिवशी दुपारी १२ वाजता रामजन्माचा सोहळा साजरा करतात. या दिवशी रामजन्माचा पाळना पण गायल्याजातो. श्रीराम हे हिंदू धर्मीयांचे आदर्श अन् लाडक दैवत. जगकल्याणासाठी, धर्म रक्षणासाठी, दुष्टांच्यार्निदालनासाठी, भगवान महाविष्णूंनी जे दशावतार घेतले, त्यामध्ये श्रीराम अवतार हा त्यांचा सातवा अवतार.रामनवमी म्हणजेच राम जन्माच्या दिवशी मठ-मंदिरात भजन, पूजन, किर्तन, प्रवचन इ. कार्यक्रम करून हाजन्मोत्सव सोहळा साजरा केला जातो. काही ठिकाणी तर गुढीपाडवा ते रामनवमी ह्या काळांत रामायणग्रंथाचे वाचन, रामकथेचे निवेदन, गीत रामायणाचे गायन इ. कार्यक्रम ही केले जातात. श्रीराम ही सर्व अबालवृद्धांची लाडकी देवता असल्यामुळे सर्व लहान थोर मंडळी ह्या उत्सवात भाग घेतात.रामनवमीचे व्रत कसे करावे
व्रत सुरु करण्यापूर्वी एक दिवस (अष्टमीस) अगोदर पहाटे स्नान संध्या आटोपून श्रीरामाचे नामस्मरण करावे
चैत्र शुक्ल नवमीला ब्रम्ह मुहुर्तास उठून घर स्वच्छ करावे घरामध्ये गोमुत्र शिंपडून घर पवित्र करावे दारास कोवळ्या आंब्यांच्या पानांची तोरणे लावावीत. दारासमोर समोरचे अंगण रांगोळीने सुशोभित करावे
'उपोष्य नवमी त्व यामेष्वष्टसु राघव| तेन प्रीतो भव त्वं भो संसारात् त्राहि मां हरे||' या मंत्राद्वारे व्रतसंकल्पना करावी व संपूर्ण आठ प्रहर उपास धरावा त्यानंतर, 'मम भगवत्प्रीतिकामनया (वामुकफलप्राप्तिकामनया) रामजयंतीव्रतमहं करिष्ये' हा संकल्प करूनकाम- क्रोध-लाभ आणि मोहापासून अलिप्त होऊन व्रत करावे
घराच्या नैतृत्य भागात मंडप टाकून त्याच्या मध्यभागी विधीपूर्वक कलशाची स्थापना करावी कलशावर राम, सीता भरत, शत्रुध्न, लक्ष्मण आणि हनुमानाच्या मूर्तींची किंवा चित्रांची प्रतिष्ठापना करावी त्यानंतर विधी पूर्वक संपूर्ण पुजा करावी दिवसभर रामायणाचा पाठ करावा तसेच होम हवन करून उत्सव साजरा करावा
दशमीला पारायण करून व्रत सोडावे
रामनवमी व्रताचे फळ
* हे व्रत नित्य, नैमित्तिक आणि काम्य अशा तीन प्रकारचे आहे. नित्य होण्याबरोबर याला निष्काम भावनाठेवून आयुष्यभर केले तर आयुष्य आनंदमय होते.
* एखाद्या निमित्ताने हे व्रत केल्यास त्याचे यथेच्छ फळ मिळते.
* विश्वासाने हे व्रत केल्यास महान फळ मिळते.

No comments:
Post a Comment