गुढीपाडवा
हिंदू धर्मियांच्या नवीन वर्षातील पहिला सन म्हणजे गुढीपाडवा. चैत्राची सुरवात ज्या दिवसाने होते तोदिवस म्हणजे गुढीपाडवा. हा दिवस साडेतीन मुहुर्तापैकी एक असून कोणत्याही नवीन कामाचीसुरूवात करण्यास शुभ मानतात. या दिवसापासूनच नामाच्या नवरात्रीला प्रारंभ होतो. आपलाभारतीयांचा नवीन वर्षाचा प्रारंभ याच दिवशी म्हणजेच चैत्र शुध्द प्रतिपदेस होतो. म्हणून या दिवसालावर्ष प्रतिपदा असे म्हणतात. गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी अभ्यंगस्नान करावे व सूर्योदयापूर्वीगुढीउभी करावी असे मानतात. हा तर आपल्या हिंदूचा अभ्यंगस्नानांनी सुरू होणारा पाडवा! प्रत्येकघरातील लहानथोरांनी नटूनथटून अलंकाराने सुशोभित होऊन गुढ्या उभारायचा दिवस, गोडधोडाचादिवस, पंचांग पुजेचा दिवस, संवत्सर फल वाचनाचा दिवस, नवीन खरेदीचा दिवस, अन् सजलेल्यासालंकृत गृहलक्ष्मी बरोबरच चैत्रपालवीने नटलेल्या या धरतीच्या वसंतआगमनाच्या उत्साहाचा दिवस
गुढी कशी उभारावी
गुढी उभी करण्याच्या काठीला प्रथम गरम पाण्याने अंघोळ घालावी तिला हळद, चंदनाची सुवासिकद्रव्यांनी प्रसादीत करावे. तिच्यावर कोरे कापड (खण) चाफ्याचा फुलांची माळ, साखरेच्या गाठी,कडूनिंब आणि टोकावर चांदीचे किंवा तांब्याचे फुलपात्र पालथे ठेवतात व अशी सजलेली गुढीसूर्योदयापासून सूर्यास्तापूर्वीपर्यंत घरावर डौलाने उभी करावी. गुढी का उभारावी
हा ब्रह्मध्वज आहे. आपल्या स्वतंत्र अस्मितेचे ते लक्षण आहे विजयाचे प्रतीक म्हणून आपण गुढीउभी करतो. चैत्र शुक्ल पक्षाच्या प्रथम दिवशी (पाडव्याला) प्रभू राम सपत्नीक आपल्या सर्वदलासमवेत अयोध्येला 14 वर्षांचा वनवास संपवून परत आले होते. त्या रावणावरच्या अतुलनीयविजयाचे कौतुक म्हणून रावणाच्या त्रासातून मुक्त झालेल्यांनी, राम आपल्या घरी परत आल्यामुळेआनंदीत झालेल्या नगर जनांनी, आपल्या आनंदाच्या प्रित्यर्थ गुढ्या उभ्या केल्या. आपली घरेदारेसजवली
गुढीपाडव्याच्या दिवशी काय करावे
सकाळी मुखमार्जनानंतर कडुनिंबाची कोवळी पाने, हिंग, ओवा, चिंच या समवेत द्यावीत असा प्रघातआहे. कारण कडुनिंब औषधी आहेच पण रसांसमवेत (आंबट, तुरट, तिखट यासारखा) याचे सेवनआयुर्वेदात महत्त्वाचे मानले आहे. या दिवशी पातेल्यात पाणी घेऊन ते घराबाहेर ठेवतात. आणिसुर्याप्रकाशाद्वारे तापलेल्या त्या पाण्याने अंघोळ करावी. या दिवशी घरातील सर्व दरवाज्यांवर आणिदेवघरात आंब्यांच्या पानाची तोरणे लावावीत. गुढीपाडव्याला आंब्याला कोवळी पालवी फुटते, त्यामुळेघरादारावर आंब्याच्या पोपटी पानांचे तोरण खुलून दिसते. कडुनिंबाची पाने अंघोळीच्या पाण्यातटाकून त्या पाण्याने अंघोळ करतात. कारण उन्हाळ्यात होणार्या त्वचारोगापासून बचाव करण्याचेसामर्थ्यही ह्यात आहे. उभारलेली गुढी कधी काढावी
सूर्यास्तापूर्वी गुढी खाली उतरवावी . त्यापूर्वी तिला धने व गूळ यांचा नैवेद्य दाखवावा व त्यावरचीसाखरेची गाठी मुलीच्या गळ्यात घालतात. तर मुलांना साखरेचे कडे देतात

No comments:
Post a Comment