Tuesday, September 23, 2014

हनुमान जयंती

our website http://shivsanskruti.com is launching 
मारोतीली हनुमान असे नाव का मिळाले 
एकदा अयोध्येचा राजा श्री दशरथ यांनी पुत्रप्राप्ती साठी पुत्राकामेछा यज्ञ केला तो यज्ञ केल्या मुळे अग्नी देवप्रसन्न झाले आणि आणि त्याने राजा दशरथास प्रसाद दिला तसाच प्रसाद पवनदेवांनी माता अंजनीस सुद्धादिला चैत्र पोर्णिमा हा मारुतीचा जन्मदिवसजन्मतःच मारुतीरायाने सूर्याकडे बघितले त्याला ते एखाद्याफळाप्रमाणे भासलेआणि तो खाण्यासाठी धावलातो मुळात पवनपुत्र असल्यामुळे वायू वेगाने त्याफळसमान सूर्यास ग्रहण करण्यासाठी  उड्डाण केलेतेंव्हा सर्व देव घाबरले आणि त्यांनी इंद्रदेवास विनवणीकेलीमारुतीस थांबवण्यासाठी सर्व देवांनी अतोनात प्रयत्न केले परंतु त्यांना त्यात यश  आल्यामुळे इंद्रदेवाने त्यावर वज्राचा प्रहार केलाते वज्र मारोतीच्या हतुवटी  वर लागल्याने मारोतीरायास हनुमान असे नाममिळाले. 
हनुमानाचे कार्य 
संकटमोचन हनुमाने अक्षनिकुंभ या सारख्या अनेक राक्षसांचा विनाश केला तसेच भिमाचेही गर्व हरण केले.महाभारतात तो अर्जुनाच्या रथाच्या ध्वजावर आरूढ होताजेथे धर्म तेथे मारुतीराया आणि जेथे मारोतीरायातेथे धर्म असे आपणाला म्हणता येईलत्याने मेघानाथास जेरीस आणलेआणि रावणालासुद्धा बेशुद्ध केले.जेंव्हा मेघ्नथाने लक्ष्मनास बेशुद्ध करून त्यास लंकेत न्यावयास निघाला होता तेंव्हा सुद्धा हनुमानानेच त्यासदूर लोटलेआणि त्याच्या उपचाराकरिता लागणारी संजीवनी बुटी साठी पूर्ण द्रोणगिरी पर्वत उचलून आणला.असे हे पराक्रमी मारुतीराया प्रभू श्री रामाचे परम भक्त होतेआणि भरलेल्या सभेत त्यांनी अपली छातीफाडून त्यात सुद्धा प्रभू श्रीरामच आहे हे सिध्द केलेमारोतीरायास सप्त चिरंजीवांपैकी एक मानले जातेतसेचत्याला संस्कृत चा अकरावा व्याकरणकार सुद्धा मानले जातेमारोतीराय हे ब्रम्हचारी होते आणि ते प्रत्येकस्त्रीला आपल्या मातेसमान मानीत असतलंकेत  त्याने राक्षस कुळातील अनेक स्त्रिया पहिल्या ,पण एकाहीस्त्रीविषयी त्याच्या मनात कोणताच वाईट विचार क्षणभरसुद्धा आला नाहीअसे हे इंद्रीयजीत पवनपुत्रहनुमान..
मारुतीला शेंदूर का लावावा
मारोतीराय जसे भीमरूपी महापराक्रमी होते तेवढेच श्री रामाचे निस्सीम आणी भोळे भक्त सुद्धा होतेएकदात्यांनी माता सीतेस आपल्या भांगेमध्ये शेंदूर लावतांना बघितले त्याचे कारण विचारले असता माता सीतात्यास म्हणाला शेंदूर लावल्याने माझ्या पतीची म्हणजेच श्री रामाची आयु वाढते ते दीर्घायुषी होतातहेऐकताच मारोती रायाने विचार केला कि जर भांगेमध्ये शेंदूर लावल्याने जर प्रभू श्री राम दीर्घायुषी होतअसतील तर पूर्ण शरीरास शेंदूर फासल्याने ते चिरंजीव व्हायला हवेत म्हणून त्याने कुठलाही विचार  करताआपल्या संपूर्ण शरीरास शेंदूर फासला. . हे प्रभू श्रीरामाला समजल्यावर ते प्रसन्न झाले आणि म्हणालेतुझ्यासारखा माझा अन्य कोणीच भक्त नाही तेंव्हापासून मारुतीचा रंग शेंदरी आहे
मारोतीची रूपे 
आपण जेंव्हा एखाद्या मारोतीच्या मंदिरात किंवा मारोतीची एखादे चित्र बघतो तेंव्हा मुख्यत्वे आपल्यालाचार रूपे दिसतात प्रताप रूप दास रूप वीर रूप पंचमुखी रूप या प्रत्येक रुपास त्या त्या प्रमाणे नावदिलेले आहे प्रताप मारुती :- एका हातात द्रोणागिरी पर्वत आणि दुसऱ्या हातात गदा , असे याचे रूप असते .यातूनमारुतीची सर्वशक्तिमानता  पाहायला मिळते .दासमारुती :- श्रीरामापुढे हात जोडून उभा असलेला , मस्तक झुकलेले आणि शेपटी भूमीवर रुळलेली,असेयाचे रूप आहे . यातून हनुमान किती नम्र आहे असे दिसते .)  वीर मारुती :- हा सतत लढण्याच्या पवित्र्यात उभा असतो .पंचमुखी मारुती :- गरुड ,वराहहयग्रीव,सिंह आणि कापिमुख अशी मूर्तींची मुखे असतातपंचमुखीचा अर्थआहे , पाच दिशांचे रक्षण करणारा . मारुती पूर्व , पश्चिम,दक्षिण,उत्तर आणि ऊर्ध्व या पाच दिशांचे रक्षणकरतो .
पूजाविधी
मारुतीच्या पूजाविधीत शेंदूर,तेल आणि रुई ची पाने वापरतातकारण याने मारोतीराय प्रसन्न होतात मारोतीची पूजा करतांना एखादे लोकरीचे आसन घेऊन पूर्व दिशेकडे तोंड करून बसावेहातात फुल  अक्षताघेऊन खालील मंत्र म्हणावेत अतुलितबलधामं हेमशैलाभदेहं दनुजवनकृशानुं ज्ञानिनामग्रगण्यं।
सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि।। ऊँ हनुमते नमध्यानार्थे पुष्पाणि सर्मपयामि।।
त्यानंतर ते फुल आणि अक्षता मारोतीरायास अर्पण करावी
 मारोतीचे आवाहन 
हातात फुल घेऊन खालील मंत्र म्हणावे आणि ते फुल मारोतीरायास अर्पण करावे उद्यत्कोट्यर्कसंकाशं जगत्प्रक्षोभकारकम्।
श्रीरामड्घ्रिध्याननिष्ठं सुग्रीवप्रमुखार्चितम्।।
विन्नासयन्तं नादेन राक्षसान् मारुतिं भजेत्।।
ऊँ हनुमते नमआवाहनार्थे पुष्पाणि समर्पयामि।।
मारोतीरायचे आसन 
हातात गुलाब किंवा कमळाचे फुल घेऊन खालील मंत्र म्हणावे आणि मारोतीरायास आसन प्रदान करावेतप्तकांचनवर्णाभं मुक्तामणिविराजितम्।
अमलं कमलं दिव्यमासनं प्रतिगृह्यताम्।।
यानंतर खालील मंत्र म्हणून एखाद्या पंचपात्रात किंवा भूमी वर हातात पाणी घेऊन तीनदा अर्पण करावे
ऊँ हनुमते नम:, पाद्यं समर्पयामि।।
अध्र्यं समर्पयामि। आचमनीयं समर्पयामि।।
त्यानंतर मारोतीरायास गंधशेंदूर,हळदकुंकुअक्षताबेलफुल  हार अर्पण करावा
आता खालील मंत्रांसोबत अगरबत्ती  धूप ओवाळावे
साज्यं  वर्तिसंयुक्तं वह्निना योजितं मया।
दीपं गृहाण देवेश त्रैलोक्यतिमिरापहम्।।
भक्त्या दीपं प्रयच्छामि देवाय परमात्मने।।
त्राहि मां निरयाद् घोराद् दीपज्योतिर्नमोस्तु ते।।
ऊँ हनुमते नम:, दीपं दर्शयामि।।
यानंतर एखाद्या केळीच्या पानावर किंवा ताटामध्ये गुळ फुटण्याचा नैवेद्य  दाखवावा
हनुमानाची आरती
सत्राणें उड्डाणें हुंकार वदनी ।।
करि डळमळ भूमंडळ सिंधुजळ गगनी ।।
गडबडिलें ब्रम्हांड धाके त्रिभुनवी ।।
सुरवर नर निशाचर त्या झाल्या पळणी ।।  ।। जय देव जय देव जय हनुमंता ।। तुमचेनी प्रसादें  भी कृतांता ।। जय।। धृ ।। दुमदुमली पाताळें उठिला प्रतिशब्द ।। थरथरिला धरणीधर मानीला खेद ।। कडकडिले पर्वत उडुगणउच्छेद ।। रामी रामदासा शक्तपचा शोध ।।
जय देव जय देव जय हनुमंता ।।  ।।
  
 मारुति स्तोत्र 
भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती 
वनारी अन्जनीसूता रामदूता प्रभंजना ॥१॥
महाबळी प्राणदाता सकळां उठवी बळें 
सौख्यकारी दुःखहारी (शोकहर्ता) (धूर्तदूत वैष्णव गायका ॥२॥
दीननाथा हरीरूपा सुंदरा जगदंतरा 
पातालदेवताहंता भव्यसिंदूरलेपना ॥३॥
लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना 
पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका ॥४॥
ध्वजांगें उचली बाहो आवेशें लोटला पुढें 
काळाग्नि काळरुद्राग्नि देखतां कांपती भयें ॥५॥
ब्रह्मांडें माइलीं नेणों आंवाळे दंतपंगती 
नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा भ्रुकुटी ताठिल्या बळें ॥६॥
पुच्छ तें मुरडिलें माथां किरीटी कुंडलें बरीं 
सुवर्ण कटि कांसोटी घंटा किंकिणि नागरा ॥७॥
ठकारे पर्वता ऐसा नेटका सडपातळू 
चपळांग पाहतां मोठें महाविद्युल्लतेपरी ॥८॥
कोटिच्या कोटि उड्डाणें झेंपावे उत्तरेकडे 
मंदाद्रीसारखा द्रोणू क्रोधें उत्पाटिला बळें ॥९॥
आणिला मागुतीं नेला आला गेला मनोगती 
मनासी टाकिलें मागें गतीसी तूळणा नसे ॥१०॥
अणूपासोनि ब्रह्मांडाएवढा होत जातसे 
तयासी तुळणा कोठें मेरुमांदार धाकुटे ॥११॥
ब्रह्मांडाभोंवते वेढे वज्रपुच्छें करूं शके 
तयासी तुळणा कैंची ब्रह्मांडीं पाहतां नसे ॥१२॥
आरक्त देखिले डोळां ग्रासिलें सूर्यमंडळा 
वाढतां वाढतां वाढे भेदिलें शून्यमंडळा ॥१३॥
धनधान्य पशुवृद्धि पुत्रपौत्र समग्रही 
पावती रूपविद्यादि स्तोत्रपाठें करूनियां ॥१४॥
भूतप्रेतसमंधादि रोगव्याधि समस्तही 
नासती तुटती चिंता आनंदे भीमदर्शनें ॥१५॥
हे धरा पंधराश्लोकी लाभली शोभली बरी 
दृढदेहो निःसंदेहो संख्या चंद्रकला गुणें ॥१६॥
रामदासीं अग्रगण्यू कपिकुळासि मंडणू 
रामरूपी अन्तरात्मा दर्शने दोष नासती ॥१७॥
॥इति श्री रामदासकृतं संकटनिरसनं नाम 
 श्री मारुतिस्तोत्रम् संपूर्णम् 
समर्थ रामदास
हनुमानाची आरती
 जय देवा हनुमंता ।
जय अंजनीसुता ॥
ॐ नमो देवदेवा ।
राया रामाच्या दूता ॥
आरती ओंवाळीन ।
ब्रह्मचारी पवित्रा ॥ ध्रु० ॥

वानरूपधारी ।
ज्याची अंजनी माता ।
हिंडतां वनांतरीं ।
भेटी झाली रघुनाथा ॥
धन्य तो रामभक्त ।
ज्यानें मांडिली कथा ॥ जय० ॥ १ ॥

सीतेच्या शोधासाठीं ।
रामें दिधली आज्ञा ॥
उल्लंधुनी समुद्रतीर ।
गेला लंकेच्या भुवना ॥
शोधूनी अशोकवना ।
मुद्रा टाकिली खुणा ॥ जय० ॥ २ ॥

सीतेसी दंडवत ।
दोन्ही कर जोडून ॥
वन हें विध्वंसिलें ।
मारिला अखया दारुण ।
परतोनी लंकेवरी ।
तवं केलें दहन ॥ जय० ॥ ३ ॥

निजबळें इंद्रजित ।
होम करीं आपण ॥
तोही त्वां विध्वंसिला ।
लघुशंका करून ॥
देखोनी पळताती ।
महाभूतें दारुण ॥ जय० ॥ ४ ॥

राम हो लक्षुमण ।
जरी पाताळीं नेले ॥
तयांच्या शुद्धीसाठीम ।
जळीं प्रवेश केले ॥
अहिरावण महिरावण ।
क्षणामाजिं मर्दिले ॥ जय० ॥ ५ ॥

देउनी भुभुःकार ।
नरलोक आटीले ।
दीनानाथ माहेरा त्वां स्वामिसी सोडविलें ॥
घेऊनी स्वामी खांदीं ।
अयोध्येसी आणिलें ॥ जय० ॥ ६ ॥

हनुमंत नाम तुझें ।
किती वर्णूं दातारा ॥
अससी सर्वांठायीं ।
हारोहारीं अम्बरा ॥
एका जनार्दनीं ।
मुक्त झाले संसारा ॥ जय० ॥ ७ ॥



our website http://shivsanskruti.com is launching soon

No comments:

Post a Comment